Ryze - Business Networking Buy Ethereum and Bitcoin
Get started with Cryptocurrency investing
Home Invite Friends Networks Friends classifieds
Home

Apply for Membership

About Ryze


Aamhi - Marathi ( Marathi Aamchi Maayboli)
Previous Topic | Next Topic | Topics
The Aamhi - Marathi ( Marathi Aamchi Maayboli) Network is not currently active and cannot accept new posts
एक स्वप्न साकारतयं -स्वदेशपरतीचं - Posted frViews: 1383
Mar 17, 2009 12:42 pmएक स्वप्न साकारतयं -स्वदेशपरतीचं - Posted fr#

Shreerang Athalye
एक स्वप्न साकारतयं -स्वदेशपरतीचं
Sunday, March 15th, 2009 AT 2:03 PM

जून १९९७ ची एक रात्र. चेन्नईतल्या महाराष्ट्र मंडळाच्या हॉस्टेलमधून नुकताच फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो होतो. दमट, गरम, खारट हवेनं हैराण होत आम्ही तिघं मित्रं नवीन गाव, भाषा, भातमय जेवण आणि नवीन सॉफ्टवेअर कंपनी या सगळ्यांशी ऍडजेस्ट करत नवीन येणाऱ्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत, एकमेकांची चेष्टा करत दिवस काढत होतो. अभी गोवेकर, विवेक दिल्लीकर आणि मी पुणेकर. घराचं भाडं जाऊन जेमतेम बचत व्हायची. तेव्हा आयटीमध्ये सध्यासारखे भक्कम पगार नव्हते. त्यात किचनमध्ये लाइट गेलेला आणि रॉकेलच्या स्टोव्हचा वास, त्यामुळे आमचं रात्रीचं जेवण बहुधा बाहेरच असायचं. शेजारच्या सर्वांन्न भवन खानावळीत डोसा, सांबार, पायसम चोपून खायचं, झोपण्याआधी गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीवर बसून कधी गप्पा, कधी गाण्याच्या भेंड्या, तर कधी एकमेकांची थट्टामस्करी करत तारे बघत पडायचं, असा आमचा दिनक्रम होता; पण रात्री चेन्नई एअरपोर्टहून विमानं उडायला लागली, की डोक्‍यातली चक्रं चालू व्हायची. विमानाचे ते लुकलुकते दिवे त्या टिमटिमत्या ताऱ्यांच्या बॅकड्रॉपवर नाक उडवून ऐटीत निघून जाताना दिसली, की आमच्या रंगलेल्या गप्पा बंद व्हायच्या. तशातच शांतताभंग करत तिघांपैकी कोणीतरी 'कब जायेंगे यार यूएस को? आय कॅन नॉट वेट नाऊ!' अशी कळ लावून जायचं. नंतर गप्पांना मूड नसायचा. मग मी जड मनानं गंजलेल्या जिन्यावरून खाली उतरून आणि अंगाला ओडोमॉस चोपडून अमेरिकेच्या स्वप्नांमध्ये रात्रभर हरवून जायचो. उगवलेला दिवस मात्र रोजच्यासारखा अस्तित्वाची जाणीव करून द्यायचा आणि मी ऑफिसच्या तयारीला लागायचो.
हे यूएसला जायचं भूत माझ्या डोक्‍यात बरीच वर्षं होतं, अगदी ९१ मध्ये मुंबईला शिकायला आल्यापासून. तसा मी अकोल्याचा... आय मीन नागपूरचा... नाही खामगावचा... छे छे नांदेडचा... छे... आयडेंटिटी क्रायसिस झाली राव... बाबा बॅंकेत असल्यामुळे दर दोन-तीन वर्षांनी बदली व्हायची. नवी शाळा, नवीन घर, नवे मित्र. या चेंजचीच नंतर सवय झाली- ऍडिक्‍शन झालं म्हणाना. बारावीला अकोल्यात असताना मला मुंबईचं प्रचंड वेड होतं. अमिताभ राहतो त्या जागी इंजिनिअरिंगला जायचा मनसुबा होता. अशी स्वप्नं घेऊन ऍक्‍टर लोक मुंबईला येतात म्हणे. असो! इमानदारीत अभ्यास केला आणि मेहनतीचं फळ मिळालं. विदर्भाला मुंबईकडून सप्रेम भेट मिळालेल्या पाच ओपन सीटपैकी एक सीट मला व्हीजेटीआयमधल्या प्रॉडक्‍शन इंजिनिअरिंगकरिता मिळाली... डोक्‍यातला यूएसए टायमर इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षी वाजला. सीनिअर कॉम्प्युटर सायन्सच्या मित्रांकडून कळायचं, की अमेरिकेत जायचं, तर फाडफाड इंग्रजी यायला हवं आणि 'see' यायला हवं. त्याला 'c` म्हणतात हे नंतर समजलं. मी अस्सल मराठीतून शिकलेलो. आता नवीन भाषा शिकणं आलं - बोली इंग्लिश आणि 'सी'!
मी प्रॉडक्‍शन इंजिनिअरिंगच्या गरम प्रयोगशाळेत भल्या मोठ्या मशिन्सवर घाम टिपत काम करत होतो; पण मनाच्या कोपऱ्यात मात्र त्या एअरकंडिशंड खोलीतला छोटासा संगणक मला सारखे 'कूल कॉल' देत होता. इंजिनिअर बनलो आणि पुणेकर व्हायचं ठरवलं. प्रॉडक्‍शन इंजिनिअर्सची पंढरी - टेल्कोमध्ये चिकटलो; पण यूएस अँड आयटीचं खूळ काही डोक्‍यातून गेलं नव्हतं. तेव्हा नुकताच पुण्यात सी-डॅकचा डिप्लोमा इन ऍडव्हॉन्स्ड कॉम्प्युटिंग सुरू झाला होता. मी नोकरीला रामराम ठोकला आणि सी-डॅकची पायरी गाठली. माझी दुसरीच बॅच. त्या वेळी सॉफ्टवेअर ट्रेनिंगचं एवढं पेव फुटलं नव्हतं आणि पुढे नोकरीची शाश्‍वतीही नव्हती; पण मोठा खंबीरपणे पाठीशी उभा राहिला आणि मी हिंमत केली. जो होगा देखा जाएगा!
आणि मग आले ते मंतरलेले दिवस. प्रोग्रॅमिंग करताना मी हरवून जायचो. एखाद्या लहान मुलाला जर त्याचं खूप आवडीचं खेळणं दिलं, तर तो कसा हरवून जातो तसंच. मॅजिकल... फंडू. ट्रेनिंगचे सहा महिने कसे गेले कळालं पण नाही. कोर्स संपल्यावर पुढील दोन वर्षं भारतीय आयटी कंपनीतून अनुभव घेत चेन्नईला पोचलो. पाण्याच्या टाकीवर, यार दोस्तांबरोबर, घिरघिरणारी विमानं आणि अमेरिकेची स्वप्नं पाहत.
स्वप्नातल्या देशात, यूएसमध्ये अखेरीस डॉट कॉम बूम झाला आणि आमची स्वप्नपूर्ती झाली. एकापाठोपाठ एक एच 1 बी व्हिसा घेत आम्ही तिघंही कॅलिफोर्नियाला पोचलो... स्वप्नातल्या जागी. आमची चेन्नईची गॅंग आता सनिवेलात जमली. आता नवीन घरी रॉकेल स्टोव्हच्या जागी कुकिंग रेंज आली, पायी-गाडीच्या ऐवजी मोटारगाडी आली. व्हॅक्‍युम क्‍लीनर, डिशवॉशर आले. सगळ्या अद्ययावत सोयी होत्या. भांडी कोणी घासायची आणि घर कोणी झाडायचं हे वाद आता कमी व्हायचे. आता स्वीमिंग, टेनिस, हायकिंग, मूव्हीजला बराच वेळ मिळायला लागला. आमची मैत्री पण अजून दृढ झाली. खरंतर आमच्यात बरेच फरक... अगदी भाषेपासून ते खाण्याच्या सवयीपर्यंत. एक एक धागा आम्हाला धरून होता - स्वप्नांच्या क्षणी एकमेकांकडून मिळालेल्या साथीचा आणि त्यातून निर्माण झालेल्या स्नेहाचा, आठवणींचा.
काळ बदलत होता
'तुम्हाला गव्हर्न्मेंट कॉलेजमधून शिकून यूएसला नोकरी करताना लाज कशी वाटत नाही,' असा युक्तिवाद करणारे 'जीवलग' स्वतःचा बायोडाटा देऊन यूएसमध्ये नोकरी शोध म्हणायला लागले होते. इकडे मंडळी फटाफट लग्नाचे बार उडवून आमचं अपार्टमेंट रिकामं करत होती. मलासुद्धा अमेरिकेतल्या एकटं जगण्याचा कंटाळा आला होता. आपलंसं, ज्याच्याकरिता ऑफिसमधून घरी जायची ओढ लागेल असं कोणीतरी मलाही हवं होतं. शेवटी मी खडा टाकला. आई, मी 'स्पेसिफिकेशन्स' पाठवतो तशी बायको शोधून दे. माझी स्पेसिफिकेशन्स पण काय हो... टिपिकल... सुंदर, सोज्वळ, सुशिक्षित, मनमिळाऊ, लांब केस... वगैरे. डॉक्‍टर आणि त्यात आर्टिस्टिक असेल तर काय... सोने पे सुहागा आणि कमाल म्हणजे मिळाली... अगदी हवी तश्‍शी.... आणि त्यात मुंबईकरीण... डॅशिंग. म्हणजे मी अभिमानानं म्हणतोय हो. उगाच गैरसमजुती नकोत.
संसार सनिवेलात सुखात सुरू झाला. एकमेका साह्य करू दोघे करू 'मार्स्टस' धर्तीवर, सौ. आणि मी एमएस आणि एमबीए केलं. दोघांची शिक्षणं संपली आणि तोवर आम्ही 'हम दो हमारे दो' झालो होतो.
एव्हाना नोकरीत स्थैर्य आलं, कॉन्फिडन्स आला, जिवाची अमेरिका करून घेतली, चार गाड्या बदलल्या, सॉफ्टवेअरमधून बिझनेस मॅनेजर म्हणून उडी घेतली. 'सौ.'नं सक्‍सेसफूल योगा बिझनेस सुरू केला. छान हवा, पाणी, निसर्गरम्य देखावे, जगभरातले क्‍युझइन्स, मुलांसाठी बेस्ट शाळा, खूप जीवलग मित्र, मोठाले पब्लिक पार्क्‍स, पब्लिक लायब्ररीज, झक्कास जॉब, दिमतीला वर्ल्डक्‍लास गाड्या... सगळं छान होतं. नथिंग टू कम्प्लेन अबाऊट. बट...
इंडियन ड्रीम
हे सगळं असतानादेखील काही तरी मिसिंग आहे, असं सारखं वाटायचं. आपलं शब्दकोडं सुटलं नाही, की चुकचुकल्यासरखं वाटत राहतं ना तसंच काहीसं. खरं तर आयुष्याच्या कोड्याची बरीच उत्तरं सापडलेली होती. बायको, मुलं, घरं, नोकरी, स्टॅबिलिटी, मॅच्युरिटी, कॉन्फिडन्स वगैरे; पण मन मात्र भारतातच राहिलं होतं. दर वेळी भारतात गेलो, की वाटायचं, की परत येऊच नये. खरं तर सिलिकॉन व्हॅलीत राहणं म्हणजे स्वच्छ सुंदर पुण्यात राहण्यासारखंच आहे; पण एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहूनदेखील जशी 'घरी' जायची ओढ लागते ना तसं वाटायचं. भारतातील धूळ, गर्दी, अस्वच्छता, ध्वनिप्रदूषण हे जाणवायचं; पण इथं खूप आपलेपणा, आपुलकी, प्रेम, जिव्हाळादेखील जाणवायचा.
अमेरिकेत माणसं दिसायची खोटी! सगळीकडे गाड्या पाहून जीव उबायचा - छोट्या - मोठ्या, स्वस्त - महाग, जॅपनीज, जर्मन, हम्मर, हायब्रीड... कोणाला भेटायचं म्हणजे अपॉइंटमेंट घेणं आलं. तसा मी काही फार लोकवेडा आहे अशातला प्रकार नाही; पण आपल्या 'स्पीसीज'मध्ये राहायला आवडतं. कार्सच्या इंडिव्हिज्युअलिस्टिक कृत्रिम जगात विचित्र वाटायचं. इथून आई-बाबा 'तुमचं करिअर सांभाळा, आमच्याकरिता कॉम्प्रमाईज करून भारतात येऊ नका,' असा प्रेमापोटी (पण माझ्या दृष्टीनं रुक्ष) सल्ला द्यायचे. तसं करिअरचं म्हणाल, तर आम्हा दोघांना भारतातही भरपूर स्कोप आहे. 'आफ्टर ऑल वुई आर द सेकंड फास्टेस्ट ग्रोईंग नेशन इन द वर्ल्ड!' एक महासत्ता बनण्याच्या मार्गावर.
मी परदेशी गेलो तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आता आम्हा परतणाऱ्या भारतीयांवर ऑपॉर्च्युनिस्ट हा शिक्का मारणं सोपं आहे; मात्र परदेशस्थ भारतीयांनीही भारताच्या प्रगतीला फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि क्रॉस पॉलिनेशन ऑफ आयडियामधून हातभार लावलेला आहे, ही विचाराची बाब आहे. असो, शेवटी आम्ही ठरवलं - फॉलो द हार्ट. भारतातत परतायलाच हवं. नाऊ ऑर नेव्हर. जोवर मुलं लहान आहेत तोवर ते शक्‍य होतं. मोठी झाली, की त्यांची ओपिनियन्स फर्म होतात, की अमेरिकेतच राहायचंय आणि नंतर रुखरूख लागून राहते, की लवकर जायला हवं होतं (मित्रांच्या अनुभवाचे बोल). डोकं अमेरिकेत, तर हृदय भारतात अशा त्रिशंकू राहण्याचा पण कंटाळा आला होता, तर फायनल एका वर्षाचं प्लॅनिंग आणि एका दशकानंतर मार्च २००८ ला परतलो.
आम्ही अमेरिकेतलं समृद्ध आयुष्य सोडून काय मिळवलं आणि गमावलं? दोन महिने भारतात रुळल्यावर मुलांनी परवा चक्क मराठीत माझ्याशी बोलायला सुरवात केली आणि मला चक्कर आली. संस्कृत श्‍लोक म्हणून दाखवले तेव्हा भरून आलं. खरं तर मी जसा मराठी 'ओन' शाळेत शिकलो; तसंच माझ्या मुलांनीही शिकलं पाहिजे अशा मताचा मी नाही. त्यांनी 'वर्ल्ड सिटिझन' व्हायला हवं आणि 'सुसंस्कृत' होण्याकरिता संस्कृत श्‍लोकच म्हटले पाहिजेत या विचारांचा तर अजिबात नाही; पण आपण ज्या भाषेत, ज्या लोकांत, ज्या विचारांत, ज्या वातावरणात वाढलो तेच अनुभव जर मुलांना मिळाले तर छान वाटतं. हा आमच्या 'कम्फर्ट'चा प्रश्‍न आहे. इतर एनआरआयईजला असाच अनुभव यायला हवा, असा हव्यास तर मुळीच नाही. जर कोणी म्हटलं, 'आम्हाला काही परत जायचं नाही भारतात,' तर वुई कम्प्लिटली अंडरस्टॅण्ड देअर पर्स्पेक्‍टिव्ह.
मुलं मात्र खूप खूष आहेत. नातेवाईकांत राहून, खूप मित्रांमध्ये खेळून आणि आजी-आजोबांच्या अटेन्शनमध्ये ती 'ऐष' करतात. त्यांना घरबसल्या आजी-आजोबा मिळाले आहेत आणि आई-बाबांना नातवंडं. घर आता भरून गेलं आणि त्यात हापूसचे आंबे, मॉन्सूनचा पाऊस, सिंहगडावर हाईक आणि झुणका-भाकरी, घरकामाला मदतीचा हात, बादशाहीचं जेवण (हो मला आवडतं!), पहिल्या पावसानंतरचा आपलासा वाटणारा सुवास आणि भाजी बाजारात जाऊन भाव करण्याची इच्छापूर्ती (सौ.ची, माझी नव्हे) हे सगळं अमूल्य- प्राईसलेस.
कळत-नकळत मन मात्र तुलना करत असतं. 'मै और मेरी तनहाई, अक्‍सर ये बातें करते है, यूएस मे होता तो कैसा होता?' सिग्नल बंद पडला तरीही चौक 'तुंबले' नाहीत आणि ग्रीन सिग्नल पडताच मागून हॉर्न देऊन उगाच 'हॉर्नीपणा' केला नाही, तर काय मजा येईल राव!
एकदा आरटीओत एजंट न वापरता जायचा हौशी उपक्रम केला. माझ्या इंडियन लायसेन्सवरील पत्ता बदलायचा किरकोळ हट्ट होता. तीन फॉर्म्स, चार तास, पाच खिडक्‍या आणि शिव्यांची लाखोली वाहत रिकाम्या हातानं परतलो. त्यात मी विसरलेलो, की सौ.पण सोबत होती. 'तुझा भारतात परतल्यापासून तोंडावरचा ताबा सुटलाय जरा शिव्या कमी कर,' हा सल्लाही मिळाला. नशिबानं मुलगा सोबत नव्हता नाही तर त्यानं 'व्हॉट डीड बाबा से आईऽऽऽ?' असा सवाल करून मला प्रॉब्लेममध्ये टाकलं असतं. शेवटी सौ.नं माझा वीक पॉइंट... उसाचा रस... बिगर बरफ, प्यायला घालून माझं डोकं आणि पोट थंड केलं.
अमेरिकेत पर्सनल लायबिलिटी, प्रॉपर्टी राइटस, राइट टू इन्फॉर्मेशन, लॅक ऑफ करप्शन (किमान सामान्य माणसाकरिता तरी), वक्तशीरपणा, स्वच्छता आणि पॅडस्ट्रियअन राइट ऑफ वे (पादचाऱ्यांना आधी रस्ता द्या) याची इतकी सवय झाली, की खरं सांगतो त्याची पदोपदी आठवण होते. रस्त्यावरून चालताना तर अगदी...'पदो...पदी.'
मी आणि सौ. प्रत्येक आल्या दिवशी ऍडजेस्ट होतोय. इथली माणुसकी, आपलेपणा, गोडवा, जिव्हाळा यांनी बहरतोय, तर इतर काही गोष्टींनी कोमेजतोय. 'कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है,' हा शाहरूखचा बोध मला पटला; पण आता एनआरआयचा मुखवटा उतरवून, नॉर्मल वावरायचं आहे. 'आपल्याकरिता', जगायचं आहे. नाटकं पाहायची आहेत, सामाजिक कामात भाग घ्यायचा आहे. आई-बाबांसमवेत राहायचं आहे, टोटल बीस साल बाद! परवा आम्ही हातानं आधार देत बाबांना पर्वतीवर घेऊन गेलो तर काय खूष होते. अपार्टमेंटच्या वॉकिंग ट्रॅकला प्रदक्षिणा मारायचा कंटाला येतो म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताजेपणा पाहून आम्हाला अमेरिकी आठवणींचा विसर पडला. थोडा हारकर भी हमने बहोत कुछ पाया था.
म्हणतात ना, 'इरादे नेक हो तो सपने भी साकार होते है!'
-सुदर्शन महाबळ

Private Reply to Shreerang Athalye

Mar 17, 2009 1:12 pmre: एक स्वप्न साकारतयं -स्वदेशपरतीचं - Poste#

Himanshu Thosar
Good one indeed..........

Private Reply to Himanshu Thosar

Mar 17, 2009 2:17 pmre: एक स्वप्न साकारतयं -स्वदेशपरतीचं - Poste#

Anuraag Fulay
अतिशय छान लिहिले आहे. वाचून मन भरून आले.
मी पण मायदेशी परततो आहे. ग्लोबल मेल्टडाउन मुळे.
14 वर्ष ह्यात रकताचे पाणी करून आयुष्यात पहिल्यांदा हातात काही ना घेता नोरी सोडून परततो आहे.
एका मनात खुशी आहे, माझ्या बायको मुलांबरोबर दिवस घालवता येतील, माझ्या बागेत बसून चहा पिता येईल, माझ्या बुलेट वर फेरफटका मारता येईल पण दुसर्‍या मनात भीती कम रखरुख आहे, काय होईल कसा होईल, नोकरी चा काय, आता काय करायचे, जी लाइफस्टाइल निर्माण केली आहे ती कशी जोपसायची वगैरे वगैरे.
पण हा लेख वाचल्यानंतर मी पहिल्या मानकडे जास्ता झुकलो आहे.
जो होगा देखा जेयेगा असे दुसर्या मनाला सांगून.
'तो' उपाशी उठवतो पण उपाशी झोपु देत नाही. माझा 'त्याच्यावर' पूर्ण विश्वास आहे अँड आय ऑनर 'हिस' डिसिशन्स.

Private Reply to Anuraag Fulay

Mar 18, 2009 7:25 amre: re: एक स्वप्न साकारतयं -स्वदेशपरतीचं - P#

Maddy
Anuragbhai,

Jo hoga Achha hi hoga! Ashyaa veli Harivanshrai Bachchan chi ek line aathavali...

"मन का हो तो अच्छा … न हो तो ज्यादा अच्छा !!"

It means that if what is happening is what you want...it is good! But if what is happening is not what you want...it only means that what is happening is what He, that is, God, wants! It can only be better!

Anuragbhai, believe me....I have always believed in this, even before I read these lines....and they have always proved to be right!

Baaki kuch problem ho gaya to hum sab dost log hain hi! Do not worry!

-Maddy.

Private Reply to Maddy

Mar 18, 2009 7:29 amre: एक स्वप्न साकारतयं -स्वदेशपरतीचं - Poste#

Ravindra Jadhav
Aaple swapna sakar vavhe yach sdichha.

R.G.Jadhav

Private Reply to Ravindra Jadhav

Mar 18, 2009 7:37 amre: re: re: एक स्वप्न साकारतयं -स्वदेशपरतीचं#

Himanshu Thosar
U s it Maddy, I totally agree with u on this dope.

'Jo hoga bhale ke liye hi hoga' is much better than 'honi ko koi taal nahi saktaa' types.

Anuraag, keep in mind that we do not know what is gonna happen when and thts why we r not able to relate the current happening and get sad with it.

Think over on the lines we discussed last week.

KIT
Cheers,

Private Reply to Himanshu Thosar

Mar 18, 2009 8:06 amre: re: re: re: एक स्वप्न साकारतयं -स्वदेशपरती#

Ashish Belagali
Great post. Zakaas vaatale. Atishay praamanikpane lihile aahe.

Come now, help us build this country. Sow your ideas and money that you brought back... so that we have the best of both worlds. :-)

/Ashish

Private Reply to Ashish Belagali

Mar 18, 2009 2:51 pmre: re: re: re: re: re: एक स्वप्न साकारतयं -स्वदेशपर#

sharad j
Excellent ! Live experience and example set by someone... Awesome narration.....Lekhakahi lajtil wachalyavar ....Please publish this in either newspaper or magazines.
We do feel so....but waiting for an opportunity to come...All the best in your future endeavors !

Private Reply to sharad j

Mar 19, 2009 12:15 pmre: re: re: re: re: re: re: एक स्वप्न साकारतयं -स्वदेश#

Renuka Narwankar
Excellent post Shree...

Well there's no place like home. No matter what n how much..

The advantages of being abroad outweigh the disadvantages.

The 'dream' and want of better and decent lifestyle ppl get carried away.

It had/has become a part of Indian culture to travel and work abroad after completion of the studies...
or when one's salary is not enough to get through.
Nothing wrong with that but it's never considered a dream unless you wake up...and waking up means realizing how much you miss your own country, your family, your roots.

Being a foreigner in any country is not always a fun situation no matter how much money he/she is earning. There will be certain emptiness no matter how financially successful one becomes out of working outside the country.

We all need to pay the prize of every decision we make.

Such topic always reminds me of the most beautiful and my fav song from the Movie 'Naam'....
"Chithi Aayi Hai "

Chithi Aaii Hai Aaii Hai Chithi Aaii Hai
Chithi Hai Vatan Se Chithi Aayii Hai
Bade Dinon Ke Baad, Ham Bevatanon Ko Yaad
Vatan Kii Mittii Aaii Hai..

Uupar Meraa Naam Likhaa Hain, Andar Ye Paigaam Likhaa Hain
O Parades Ko Jaane Vaale, Laut Ke Phir Naa Aane Vaale
Saat Samundar Paar Gayaa Tuu, Hamako Zindaa Maar Gayaa Tuu
Khuun Ke Rishte Tod Gayaa Tuu, Aankh Men Aansuu Chhod Gayaa Tuu
Kam Khaate Hain Kam Sote Hain, Bahut Zyaadaa Ham Rote Hain...

Suunii Ho Gain Shahar Kii Galiyaan, Kaante Ban Gain Baag Kii Kaliyaan
Kahate Hain Saavan Ke Jhuule, Bhuul Gayaa Tuu Ham Nahiin Bhuule
Tere Bin Jab Aaii Diivaalii, Diip Nahiin Dil Jale Hain Khaali
Tere Bin Jab Aaii Holii, Pichakaarii Se Chhuutii Golii
Piipal Suunaa Panaghat Suunaa Ghar Shamashaan Kaa Banaa Namuunaa
Fasal Katii Aaii Baisaakhii, Teraa Aanaa Rah Gayaa Baakii...

Pahale Jab Tuu Kat Likhataa Thaa Kaagaz Men Cheharaa Dikhataa Thaa
Band Huaa Ye Mel Bhii Ab To, Khatam Huaa Ye Khel Bhii Ab To
Dolii Men Jab Baithii Bahanaa, Rastaa Dekh Rahe The Nainaa Main To Baap Huun Meraa Kyaa Hai, Terii Maan Kaa Haal Buraa Hai
Terii Biivii Karatii Hai Sevaa, Suurat Se Lagatii Hain Bevaa
Tuune Paisaa Bahut Kamaayaa, Is Paise Ne Desh Chhudaayaa
Panchhii Pinjaraa Tod Ke Aajaa, Desh Paraayaa Chhod Ke Aajaa
Aajaa Umar Bahut Hai Chhotii, Apane Ghar Mey Bhii Hain Rotii......

@ Anuraag "Apane Ghar mey bhi hain rotii"

Private Reply to Renuka Narwankar

Mar 19, 2009 12:34 pmre: re: re: re: re: re: re: re: एक स्वप्न साकारतयं -स्वदे#

Anuraag Fulay
हम तो हैं परदेस में, देश में नीकला होगा चाँद
अपने रात की झील में कितना तन्हा होगा चाँद...

हे रोज ऐकून आता पीसी ही वैतागला आहे रेणू.

Comming back- not with disgust but with pride.

मनापासून

thanks to you all for such a lovely support.

ab to jo hoga achcha hi hoga.

Private Reply to Anuraag Fulay

Mar 19, 2009 12:54 pmre: re: re: re: re: re: re: re: re: एक स्वप्न साकारतयं -स्वद#

Himanshu Thosar
Goooood anuraag.

All da bessst

Private Reply to Himanshu Thosar

Mar 19, 2009 2:11 pmre: re: re: re: re: re: re: re: एक स्वप्न साकारतयं -स्वदे#

sharad j
Thats true Renuka...!!!

Some of them like to express but most of them feel shy to express and feel proude to shut their feelings.... and yes, when something comes unexpected, then they litterly feel disgusting & devastated... its life..!!! No one is happy to that extent...just pretend happy faces..:-)) like this...

Private Reply to sharad j

Mar 23, 2009 3:41 pmre: re: re: re: re: re: re: re: re: एक स्वप्न साकारतयं -स्वद#

Girish Morje
Mitrano mazhe mat vegale kase asu shakel. Mi tar baryach vela asthai swarupat paredeshat sthaik zhalo aahe.

Vivenchnat kay padnar, aayurashat je haravale hote te lavkar gavasanyacha dhas hota. pan shevatla hech khare untacha budacha muka ghaycha mhatale tar shiddi lagate kinva unt tari khali basaychi vat pahavi lagate. aso barech jan asha karatat and kahi vaifalyat pan sukh manun tithech aapla ashiyana banavtat.

mala ek prashan vicharava vatato. shevatala sukhachi vyakhya kay?

aaple te sukh and dusrya kade aahe te dukha?

tajmahal ekach asto to pahanya karata zopaychi echech zhali tari mumtaz melyavar shahajan ne te badhale.

aso sudnyas adhik n sangale lage.

Private Reply to Girish Morje

Mar 24, 2009 8:56 amre: re: re: re: re: re: re: re: re: re: एक स्वप्न साकारतयं -स्#

Anuraag Fulay
प्रिय गिरीश
तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. आणि अवघ्या डीड वर्षातच मी वैतगलो आहे. तो उंट बसण्याची वॉट ह्या पुढे नाही बघायची असे म्हणून परत मायदेशी परत्तो आहे.
पण मात्र मायदेशी आपले काय होईल ही चिंता मात्रा नक्कीच वाटते. बघू काय मांडून ठेवले आहे पर्मेश्वरानि.
मुंबईत आलो की आपण सर्व भेटूया नक्की.

Private Reply to Anuraag Fulay

Mar 24, 2009 4:33 pmre: re: re: re: re: re: re: re: re: re: re: एक स्वप्न साकारतयं -स#

Girish Morje
Anuragji:

Mulich vichar karu naka ethe kay hoil. Ek Aahe sukh soina pradhanya nahi dile tar jaganya karata and melyavar pan je lagate te ethech milel.

Don ashru aaplya lokanchya virahat kadhanya pekha don ashru hastya umtale tar jarur paha. Ekhadya pardeshi manasa shi jamaun ghenya peksha rastyatalya aaji ajobanchi chavkashi kara. ashirwad tari nakki milel.

aso mi tumhala kay sanganar. Tumchya kadun khup shikaychi apeksha aahe, lavkar ya.

ek line tymchya shailit:

Je swapnatun haravale ye jage pani kay pahashil tu
Je tuzhe aahe tuj pashi te ka kadhi dusryat dhundshil tu.

vishwashi parikramana hoi punra parat yeta ugamashi
mag kay karit harila tu bhraman lakshya vina ya janmi.

tuj olkhiche ase kiti bhetale
tuj preme anlingane kiti jahal
tuj pashi tuj premi kiti patale
ka kari koni ha hishob
jenvha aaple te sarvanshi pratham priye

Private Reply to Girish Morje

Mar 25, 2009 7:50 amre: re: re: re: re: re: re: re: re: re: re: re: एक स्वप्न साकारतयं -#

Ashish Belagali
Wa wa! Kaay chhaan poetic uttar aahe!!

Girishji, tumchi hi side maahiti navhati ho.

Anuraagji, yaa ho... tension ajibaat gheu nakaa... je kaahi vhaayche te aaple sarvaanche ekdamach hoil.

Cheers,

/Ashish

Private Reply to Ashish Belagali

Mar 26, 2009 9:43 ampu la....#

Anuraag Fulay
तुम्हा सर्वन्नचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि एवढा सपोर्ट बघून मन भरून आले.
आता कसलीही भीती नाही.
. सगळे जण पाठीशी उभे असतांना कसे काय काही विपरीत घडेल.

Private Reply to Anuraag Fulay

Mar 26, 2009 10:28 amre: pu la....#

Nilesh Joshi
Hi Anurag,

Gudhi ubharuya nav chaitanyachi ani nav bhagyachi ! Sarva AM parivarala Gudhi Padvya chya hardik shubecha.

I have been reading this thread with interest as few of my relatives & friends are/have going thru similar predicament, especially the emotional turmoil of old parents of cousins who visit only occassionally. Firstly, I appreciate the thought chain started by Maddy expressing the sense of brotherhood. Yes ! The support of near & dear ones is important in traumatic phases.

But I suggest a slight attitudinal change. Get that "rest assured" feeling & confidence not because of the suppport from family & friends but because

A)The Ups and Downs are part of life. The Down phase will definitely be over, sooner than later and there will be a new Dawn.

B)Returning to India (or for that matter, any decision) is my decision and I shall handle the difficult period with calm and tide over the challenges to build a new & better tomorrow.

Rest all is well said by others.

Warm regards,
Nilesh

Private Reply to Nilesh Joshi

Mar 26, 2009 11:23 amNew year Greetings#

Ravindra Jadhav
नूतन वर्षाभिनंदन, नवीन वर्ष आपणास सुखाचे आणि भरभरातीचे जाओ याच सदिच्छा.

R.G.Jadhav

Private Reply to Ravindra Jadhav

Previous Topic | Next Topic | Topics

Back to Aamhi - Marathi ( Marathi Aamchi Maayboli)





Ryze Admin - Support   |   About Ryze



© Ryze Limited. Ryze is a trademark of Ryze Limited.  Terms of Service, including the Privacy Policy