Ryze - Business Networking Buy Ethereum and Bitcoin
Get started with Cryptocurrency investing
Home Invite Friends Networks Friends classifieds
Home

Apply for Membership

About Ryze


Aamhi - Marathi ( Marathi Aamchi Maayboli)
Previous Topic | Next Topic | Topics
The Aamhi - Marathi ( Marathi Aamchi Maayboli) Network is not currently active and cannot accept new posts
सांगा कस ज&#2327Views: 849
Nov 24, 2009 6:06 amसांगा कस ज&#2327#

Maddy


सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!
.
डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुम्च्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!
.
कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!
.
पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!
.
पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!
.
सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!
.
-मंगेश पाडगावकर

Private Reply to Maddy

Nov 24, 2009 7:03 amre: सांगा कस ज&##

Nilesh Joshi
मरणे आपल्या हातात असते
आत्महत्या करणे सोपे असते
जगणे मात्र कठीण असते
क्षणा क्षणांचे ओझे असते
पण जगणे काही देउन जाते
सुख दुखा चे अंतर कळते
जगायचे का मारायचे ते तुम्हीच ठरवा
जगायचे ठरवल्यावर कसे जगायचे ते पाडगावकरांची कविता वाचून ठरवा

Private Reply to Nilesh Joshi

Previous Topic | Next Topic | Topics

Back to Aamhi - Marathi ( Marathi Aamchi Maayboli)





Ryze Admin - Support   |   About Ryze



© Ryze Limited. Ryze is a trademark of Ryze Limited.  Terms of Service, including the Privacy Policy