|  |
| |
| The Aamhi - Marathi ( Marathi Aamchi Maayboli) Network is not currently active and cannot accept new posts | North east under threat - marathi article by Ret Brig Mahajan | Views: 861 | Feb 13, 2010 6:39 am | | North east under threat - marathi article by Ret Brig Mahajan | # |  Shreerang Athalye | | ईशान्येला घुसखोरीचा कर्करोग हेमंत महाजन Saturday, February 13, 2010 AT 12:30 AM (IST) Tags: featured article बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीची समस्या गंभीर आहे. आसामचा लोकसंख्येचा तोल त्यातून बिघडत आहे. त्यातून एखादा बांगलादेशी आसामचा मुख्यमंत्री होऊ शकेल.
बांगलादेशातून भारतात होणारी घुसखोरी हा चिंतेचा विषय आहे. या घुसखोरीमुळे ईशान्येकडील राज्यांच्या लोकसंख्येचा तोलच बिघडला आहे. सध्या देशात तीन कोटींपेक्षा जास्त बांगलादेशी घुसखोर आहेत. त्याचा फटका आसामसारख्या राज्याला अनेक दशके बसत आहे. घुसखोरी अशीच चालू राहिल्यास, आसामची राजकीय आणि सामाजिक स्थिती बिघडून जीवनपद्धत व लोकसंख्येचा तोलही बिघडेल, अशी भीती आहे. घुसखोरीबाबत कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. या समस्येवर मात करण्यासाठी काही धोरणात्मक उपाययोजना करायला हव्यात.
बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीचा सर्वाधिक फटका आसामला बसत असल्यामुळे 1979 ते 1985 या काळात राज्यात अहिंसक पद्धतीने आंदोलन झाले. अखिल आसाम विद्यार्थी संघटनेच्या (आसू) नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. त्यातून 1985 मध्ये आसाम करार झाला. 25 मार्च 1971 नंतर बांगलादेशातून आसाममध्ये स्थायिक झालेल्या कोणालाही नागरिक न मानता घुसखोर समजले जाईल, असे या करारात स्पष्ट करण्यात आले. पण करारातील या तरतुदीची अंमलबजावणी न झाल्यामुळे बांगलादेशींची घुसखोरी चालूच राहिली. पश्चिम बंगालला लागून असलेल्या लोअर आसाममधून, बांगलादेशाच्या सीमेला लागून असलेल्या कछार व करीमगंज या जिल्ह्यांतून आणि बांगलादेश-मेघालय सीमेवरून ही घुसखोरी सुरू आहे. दुर्गम भूप्रदेशामुळे आसाम-बांगलादेश सीमेवरील 262 किलोमीटरच्या भागाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. एका अंदाजानुसार, आसाममधील दोन कोटी साठ लाख लोकांपैकी साठ लाख बांगलादेशी घुसखोर आहेत. ही घुसखोरी अशीच चालू राहिल्यास, आसाम लवकरच बृहत् बांगलादेशाचा एक भाग होईल, असा इशारा आसामी बुद्धिवंतांनी दिला आहे. धुब्री आणि गोलपाडा या जिल्ह्यांतील लोकसंख्येचा तोल पूर्वीच ढासळला असून, बरपेटा, नलबाडी, नगाव आणि दरांग हे जिल्हेही त्याच मार्गावर आहेत.
घुसखोरीची समस्या राजकारणाशी निगडित आहे. सत्तेवर राहण्यासाठी बहुतेक स्थानिक राजकीय नेते या घुसखोरांच्या मतांवर अवलंबून आहेत. त्याचा तोटा म्हणजे आसामी समाजाला भेडसावणाऱ्या या अत्यंत गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची गरज कोणाला वाटत नाही. त्यामुळे घुसखोरी रोखण्यात राजकारण्यांना अपयश येत असल्याची भावना समाजात निर्माण झाली असून, त्यातून एक हताशपणा आणि वैफल्य येत आहे. घुसखोरीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत संशयास्पद स्थिती आहे. आजपर्यंत सुमारे बारा लाख बांगलादेशी नागरिक व्हिसाच्या अधिकृत माध्यमातून भारतात आले; पण नंतर गायब झाले आहेत. घुसखोरांचा शोध घेऊन त्यांना परत पाठविण्यात आपल्या सुरक्षा यंत्रणेला कसे अपयश येत आहे, याचे हे उदाहरण आहे.
बांगलादेशींच्या घुसखोरीमुळे हिंदूबहुल आसामला मुस्लिमबहुल राज्य होण्याची भीती वाटू लागली आहे. त्यातून आसामी हिंदू आणि आसामी मुस्लिमांमध्ये अकारण तणाव निर्माण होऊ लागला आहे. विद्यापीठे आणि प्रसारमाध्यमांतून ही भीती आणि तणावाचे प्रतिबिंब उमटते. आसामचे माजी राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल एस. के. सिन्हा यांनी 1998 मध्ये राष्ट्रपतींना पाठविलेल्या अहवालात त्याचा उल्लेख केला होता. लोअर आसामच्या जिल्ह्यांत वाढत असलेल्या बांगलादेशींच्या घुसखोरीमुळे हा भाग मुस्लिमबहुल होत असल्याचे या अहवालात स्पष्टपणे म्हटले होते.
घुसखोरांना मिळतात फायदे बांगलादेशातून आसाममध्ये येणाऱ्या घुसखोरांनी वेगळी श्रमिक संस्कृती निर्माण केली आहे. रिक्षाचालक, घरबांधणीच्या कामांवरील मजूर, रंगारी, माळी, रस्तेबांधणी, भाजीपाला विक्रेते आदी कामे ते करतात. त्यांच्यातील महिला मोलकरणीची कामे करतात. कोणतीही कामे करण्यास ते तयार असतात आणि स्थानिक मजूर जे काम टाळतो, तेही हे घुसखोर करतात. काळ्या बाजारातून बनावट कागदपत्रे तयार करून हे घुसखोर भारताचे नागरिकत्व मिळवतात. हे लोक अत्यंत गरीब असल्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्यसेवेचे फायदेही त्यांना मिळतात.
घुसखोरांच्या समस्येचा राष्ट्रीय सुरक्षेशीही संबंध आहे. आसाममध्ये धुमाकूळ घालणाऱ्या "युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम' (उल्फा), "कामतापूर लिबरेशन ऑर्गनायझेशन' (केएलओ) आणि "नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलॅंड' (एनडीएफबी) या दहशतवादी संघटनांचे बांगलादेशात तळ आहेत. या संघटना बांगलादेश-म्यानमार सीमेवरील कोक्सबाजार येथून शस्त्रास्त्रांची खरेदी करत असल्याचेही सिद्ध झाले आहे. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशात अवामी लीगचे सरकार आल्यानंतर त्यांनी भारताला सहकार्य सुरू केले असून, "केएलओ'चा म्होरक्या तपन पटवारी याला ढाक्यात गेल्या ऑक्टोबरमध्ये अटक करण्यात आली. "उल्फा'चा अध्यक्ष अरविंद राजखोवा आणि त्याचा उपप्रमुख राजू बरुआ यांना गेल्या वर्षीच्या चार डिसेंबरला कोक्सबाजारमध्ये पकडण्यात आले. नंतर मेघालयाच्या सीमेवर आसाम पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. बांगलादेशाच्या मैमनसिंग व चितगाव या जिल्ह्यांत "उल्फा'चे दहा तळ होत. केवळ बांगलादेशातून मिळणाऱ्या मदतीमुळे नव्हे, तर आसाममध्ये असलेल्या घुसखोरांनी "उल्फा'ला केलेल्या सहकार्यामुळे हे साम्राज्य उभे होते. 30 ऑक्टोबर 2009 रोजी आसाममध्ये झालेल्या स्फोटांत 83 जण ठार आणि 30 जण जखमी झाले होते. त्यामागे "उल्फा', "एनडीएफबी' आणि बांगलादेशातील "हरकत उल जिहादी ए इस्लामी' (हुजी) यांचा हात असल्याचा संशय आहे.
या समस्येवर मात करण्यासाठी उपाय योजावे लागतील. मतबॅंकेच्या राजकारणाला प्रथम विरोध करावा लागेल. त्यासाठी सातत्याने त्याच्या विरोधात लेखन आणि प्रचार करायला हवा. जनगणनेच्या आकडेवारीचा आधार घेऊन मतदारांची संख्या जाहीर करावी, मतबॅंकेचे राजकारण टाळण्यासाठी राजकारण्यांना आवाहन करणे आणि निवडणूक आयोगाने नेमलेल्या विशेष समितीतर्फे आसामी मतदारांच्या यादीवर लक्ष ठेवणे, हे उपाय योजता येतील. "वर्क परमिट'ही जारी करता येतील. घुसखोरांची समग्र माहिती गोळा करून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना नुकत्याच भारतात येऊन गेल्या. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याबरोबरची त्यांची चर्चा आशादायक झाली. दहशतवादाविरुद्ध लढा आणि गुन्हेगारांच्या हस्तांतराबाबत दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. आता पुढे पावले टाकायला हवीत.
बांगलादेशातून अद्यापही घुसखोरी सुरूच आहे. त्याचा परिणाम ईशान्येकडील राज्यांवर होत आहे. आपण वेळीच सावध न झाल्यास, 2020 पूर्वी आसामच्या मुख्यमंत्रिपदी एखादा बांगलादेशी बसल्याचे पाहण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर येईल, हे निश्चित!Private Reply to Shreerang Athalye | Feb 13, 2010 9:08 am | | re: North east under threat - marathi article by Ret Brig Mahajan | # |  Venkatesh Shanbhag | | Hi Shree, We should congratulate our politicians and Govt for this dirty vote bank politics and sleeping over this issue since 1985. It has reached a point of no return now. Watch some more videos on youtube
http://www.youtube.com/watch?v=8cA-VRYmSPE&NR=1
http://www.youtube.com/watch?v=8xfc4-AOrrcPrivate Reply to Venkatesh Shanbhag |  |
| |
| |